Englishमराठी
सर्व भाविकांसाठी ऑनलाइन नोंदणीकृत पूजा बुकिंग लवकरच चालू करतो आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी. सर्व भाविकांना ही नम्र विनंती आहे की मंदिराची 175 वा वाढदिवस लवकरच साजरा करण्यात येणार आहे. तसेच मंदिराचा शिखराचे काम सध्या चालूआहे. . आमचा प्रयत्न हा आहे, की , जुन्या पद्धतीने 175 वर्षापूर्वी स्थापना केलेले मंदिर जसे होते, काळा पाषाणमधील दगडी चिरे त्याच पद्धतीने आपल्या समोर सादर व्हावेत म्हणूनच रंग काढण्याचे काम सध्या चालू आहे. हे काम क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे. त्याला तुमच्या सर्वांची मदत अपेक्षित आहे. आपल्या भावनांचा आदर करून आम्ही आपल्या मदतीची अपेक्षा करतो आहे.

Changdeo

आनंदी पहाट ?

भक्ती योग सामर्थ्याची

⚜️⚜️⚜️⚜️⚜️
!! मनाचिये वारी पंढरीची !!
⚜️⚜️⚜️⚜️⚜️

?⚜️?????⚜️?

तेंवि तूंतें मी गिवसी ।
तेथें तूंपण मीपणेंसी ।
उखते पडे ग्रासीं ।
भेटीची उरे ।
…. संत ज्ञानेश्वर (चांगदेव पासष्टी)

पुणतांबा जि. अहमदनगर असो वा चांगावटेश्वर मंदिर सासवड जि. पुणे ही निसर्गरम्य परिसरातील नदीकाठावरील पुरातन मंदिराची गावे, ही योगी चांगदेवांच्या तपसाधनेची पवित्र भूमी.
‘मनाचिये वारी’ तील दहा मानाच्या पालखींमध्ये चांगावटेश्वरांची सासवड ची पालखी आहे.
चांगदेव हटयोगी. फार मोठे जीवन लाभलेले. त्यांनी १४ ठिकाणी योगसाधना केलीय. आजही वाघालाही अंकीत ठेवण्याची कला दिसते. पण आपल्या योगसामर्थ्याने वाघावर स्वार होत फिरणारे योगी ही चांगदेवांची ओळख. त्या सामर्थ्याने थोडे अहंकारीही.
त्यांनी ज्ञानोबांची कीर्ती ऐकली. भेटण्याआधी त्यांना पत्र लिहायला घेतले. ज्ञानोबांना मोठे संबोधावे की लहान, आशिर्वाद लिहावा की नमस्कार या विचारात अडकून त्यांनी कोरेच पत्र पाठवले. त्याला ज्ञानोबांनी दिलेले उत्तर म्हणजे ६५ ओवींची ‘चांगदेव पासष्टी’. एकमेकांशी वागताना मानवी मनात जो अहंकार प्रकटतो त्याला घातलेली वेसण.
शिक्षण.. व्यासंग.. ज्ञान.. पद.. प्रतिष्ठा.. श्रीमंतीच्या ऐटीत मनुष्याच्या व्यवहारात अहंकार आडवा येतो. समोरच्याला कमी जास्त लेखले जाते. पण कोणत्याही बाबतीत “भेदाभेद अमंगळ” हे धर्माचे ब्रीद माऊली सांगतात. माऊली चांगदेवांना म्हणतात, “तुझ्या स्वरूपाचा विचार करताना माझा “मी” पणा आणि तुझा “तू” पणा दोन्ही नाहीसे होऊन फक्त एक आत्मतत्त्व काय ते शिल्लक उरतें.” अर्थातच जगात समस्त मानव एकच आहोत. कुणीही कमी जास्त नाही. भेदाभेद नकोच.
?♾️??♾️??♾️?
भारतीय समाजव्यवस्था आदर्श कारण इथे मातापित्यांचा आदर होतो. हा आदर्श ठेवलाय तो भक्त पुंडलिकाने. कलियुगातही चमत्कार घडला. मातापिता हेच पहिले परमेश्वर.. तेच विठ्ठल रखुमाई. हे पुंडलिकाने सिद्ध केले, म्हणूनच सेवाधर्मामुळे प्रत्यक्ष परब्रह्माला त्याच्या भेटीला यावे लागले. पंढरपूर वारीत हाच सेवाभाव शेकडो वर्ष दृढ होत आहे. समाजात रुजतोय.. भावभक्तीने त्याची उजळणी होतेय.
आषाढसरींची पर्वा न करता मनाचिये वारी आनंदाने पंढरीची वाटचाल करत आहे. “ज्ञानोबा तुकोबां” च्या बरोबरीने ज्याच्या भक्तीने ही वाट सापडली त्या पुंडलिकाचाही जल्लोषात जयजयकार होत आहे. तर बोला..
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल..

?⚜?????⚜?

कलियुगामाजी अपरूप झाले
भक्ताच्या दर्शना भगवंत आले
पुंडलिका भेटी परब्रह्म आले

पुंडलिकासाठी धाव घेई श्रीहरी
कर कटिवरी, उभा विटेवरी
नित्य पंढरीत नाम घोष चाले

धन्य पुंडलीक, धन्य त्याची सेवा
भूलोकी आणिला कैवल्याचा ठेवा
पिढ्यापिढ्यांवरी उपकार केले

विठ्ठल चरणी नाही भेदभाव
नाही जातपात, नाही रंकराव
समतेचा ओघ पुढेपुढे चाले

?????????

गीत : अण्णासाहेब देऊळगावकर ✍️
संगीत : भास्कर चंदावरकर
स्वर : रवींद्र साठे
चित्रपट : भक्त पुंडलिक (१९७५)

????? ?

‼पुंडलीक वरदा हरि विठ्ठल‼

!! नियम पाळा, सुरक्षित रहा !!

Open chat
1
We're Online! How may I help you?
We're Online!
How may I help you?