Englishमराठी
सर्व भाविकांसाठी ऑनलाइन नोंदणीकृत पूजा बुकिंग लवकरच चालू करतो आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी. सर्व भाविकांना ही नम्र विनंती आहे की मंदिराची 175 वा वाढदिवस लवकरच साजरा करण्यात येणार आहे. तसेच मंदिराचा शिखराचे काम सध्या चालूआहे. . आमचा प्रयत्न हा आहे, की , जुन्या पद्धतीने 175 वर्षापूर्वी स्थापना केलेले मंदिर जसे होते, काळा पाषाणमधील दगडी चिरे त्याच पद्धतीने आपल्या समोर सादर व्हावेत म्हणूनच रंग काढण्याचे काम सध्या चालू आहे. हे काम क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे. त्याला तुमच्या सर्वांची मदत अपेक्षित आहे. आपल्या भावनांचा आदर करून आम्ही आपल्या मदतीची अपेक्षा करतो आहे.

Pandhari

आनंदी पहाट ?

विठ्ठल महात्म्याची

⚜️⚜️⚜️⚜️⚜️
!! मनाचिये वारी पंढरीची !!
⚜️⚜️⚜️⚜️⚜️

?⚜️?????⚜️?

मुक्तजीव सदा होति पै नामपाठें ।
तेंचि रूप ईटे देखिलें आम्ही ॥
पुंडलिकें विठ्ठल आणिला पंढरी ।
आणूनि लवकरी तारी जन ॥
ऐसें पुण्य केलें एका पुंडलिकेंची ।
निरसिली जनाची भ्रमभुली ॥
मुक्ताई चिंतनें मुक्त पैं जाली ।
चरणीं समरसली हरिपाठें ॥
…..आदिमाया संत मुक्ताबाई

मुक्ताईनगर (एदलाबाद) हे खान्देशातील गाव, भागवत धर्मियांचे श्रद्धास्थान. ज्या संत मुक्ताईने जगाला मुक्तीचा.. आनंदाचा मंत्र दिलाय तिचे वास्तव्यस्थान. मनाचिये वारीत दहा पालखी मध्ये संत मुक्ताबाई यांची पालखी पण आहे.
संत मंडळीं जगात अवतरले ते मानवी रुपात. मग मानवी स्वभावाचे गुणदोषही आलेच. एकदा मात्र उपेक्षा.. अपमानाची परिसीमा झाली अन् ज्ञानोबांनी स्वतः ला कोंडून घेतले. तेव्हा बालवयातील मुक्ताईने ज्ञानोबांना केलेला उपदेश म्हणजे समस्त जगाला नित्य व्यवहारात सुखासाठीचा मंत्रच.
माऊली हे तर मोठे संत. तेव्हा मनही मोठे हवेच. मुक्ताई म्हणतात “संत जेणे वहावे, जग बोलणे सोसावे” ही मनोवृत्ती हवी. मनात मानसन्मानाचा लवलेशही नको. तेव्हा बालिका मुक्ताईने.. “चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा” गळ घातली. ताटी म्हणजे कवाडे. अर्थातच ज्ञानाची. ही कवाडे उघडली की मन हे मानसन्मान अहंकारात अडकत नाही.
अनेकदा समोरच्याचे शब्द हे शस्त्र बनून येतात, तेव्हा अपमान वाटतो.. मनस्ताप होतो मन उद्विग्न होते. पण हे अपमान करणारेही आपलेच असतात. दातांनी जीभ चावली म्हणून कुणी बत्तीशी तोडत नाही. तेव्हा कुणावरही राग नकोच. हे शब्द वापरणारे शत्रूसुद्धा या ब्रह्माचाच तर एक भाग आहेत.
हे जग कळलेय ते केवळ आमच्या संतमंडळींनाच. मग जगाच्या व्यवहाराकडे तटस्थपणे राहून मान अपमानाची तमा न बाळगता ते जगाचे कल्याणच बघतात. तेव्हा हा “संत उपदेश माना. ताटी उघडा ज्ञानेश्वरा” असे ही मुक्ताई विनवते.
बालवयात अपमान.. दुःख सोसूनही मुक्ताईचे विचार.. वर्तणूक ही प्रेमळ.. पवित्र.. निर्मळ पराकोटीची समंजस होती. अशा चिमुरड्या मुक्ताबाईला महान योगी संत चांगदेवांनी गुरु मानले, एवढी तिची थोरवी. भक्तांसाठी तर ही आदिमायाच. वारीत हाच सुसंगतीत सदविचारांचा.. सुखशांतीचा भक्ती मार्ग सापडतो.
वारी पंढरीकडे विठ्ठलाच्या.. संतांच्या नामघोषात वाटचाल करतेय. हा विठुराया आहेच सगळ्यांवर निरपेक्षपणे कृपा करणारा. तो लेकुरवाळा आहे. त्याच्या संगतीला लाखो वारकरी आहेत. जगाला दृष्टी देणारे.. लोकांना सन्मार्गावर आणून त्यांचे जीवन सुखी करणारे सारे संतगणही आहेत. विठुराया भक्तांच्या हितास्तव त्यांचाही मार्ग प्रशस्त करतोय.

?⚜?????⚜?

विठू माझा लेकुरवाळा ।
संगे गोपाळांचा मेळा ॥१॥

निवृत्ती हा खांद्यावरी ।
सोपानाचा हात धरी ॥२॥

पुढे चाले ज्ञानेश्वर ।
मागे मुक्ताई सुंदर ॥३॥

गोरा कुंभार मांडीवरी ।
चोखा जीवा बरोबरी ॥४॥

संत बंका कडेवरी ।
नामा करांगुळी धरी ॥५॥

जनी म्हणे गोपाळा ।
करी भक्तांचा सोहळा ॥६॥

?????????

रचना : संत जनाबाई ✍️
संगीत : वसंत प्रभू
स्वर : आशा भोसले

????? ?

‼पुंडलीक वरदा हरि विठ्ठल‼

!! नियम पाळा, सुरक्षित रहा !!

??सुमंगल प्रभात??
१२.०७.२०२१

Open chat
1
We're Online! How may I help you?
We're Online!
How may I help you?