Englishमराठी
सर्व भाविकांसाठी ऑनलाइन नोंदणीकृत पूजा बुकिंग लवकरच चालू करतो आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी. सर्व भाविकांना ही नम्र विनंती आहे की मंदिराची 175 वा वाढदिवस लवकरच साजरा करण्यात येणार आहे. तसेच मंदिराचा शिखराचे काम सध्या चालूआहे. . आमचा प्रयत्न हा आहे, की , जुन्या पद्धतीने 175 वर्षापूर्वी स्थापना केलेले मंदिर जसे होते, काळा पाषाणमधील दगडी चिरे त्याच पद्धतीने आपल्या समोर सादर व्हावेत म्हणूनच रंग काढण्याचे काम सध्या चालू आहे. हे काम क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे. त्याला तुमच्या सर्वांची मदत अपेक्षित आहे. आपल्या भावनांचा आदर करून आम्ही आपल्या मदतीची अपेक्षा करतो आहे.

Free Books

कौडिंण्यपूर (कुंडनपूर) जि. अमरावती (प्राचीन इंद्रपुरी) हे विदर्भातील गाव म्हणजे प्रति पंढरपूर. कृष्णाशी रक्ताचे नाते जुळलेला हा पवित्र भूभाग. ‘मनाचिये वारी’ त दहा पालखीपैकी ४२५ वर्षे परंपरेची कौडिंण्यपूरची ही एक आई रुख्मिणीची पालखी. या पालखीचे ४० ठिकाणी मुक्काम होतात, एवढा प्रदीर्घ प्रवास.
पौराणिक काळ लगेचच डोळ्यासमोर तरळावा अशी ही सगळी गावे. कौडिंण्यपूर ही विदर्भ देशाचा राजा भीष्मकाची राजधानी होती. राजा भीष्मकाने कन्यारत्न झाल्याचा मोठा उत्सव राज्यात साजरा केला. दानधर्म केला. कन्येचे नाव ठेवले रुख्मिणी. जी सोन्यासारखी तेजःपुंज आहे. जी कृष्णाची शक्ती आहे. जी भक्तांसाठी जगन्माता आहे.
रुख्मिणीमाता आदर्श कन्याही.. तिच्या भावाने (रुख्मिने) राजकारणासाठी ठरवलेला विवाह टाळून तिने कृष्णाला प्रेमाची गळ घातली आणि गळ्यात माळही घातली हे सर्वश्रूतच.
कृष्णाने रुख्मि.. शिशुपाल.. जरासंध यांना युद्धात हरवून ज्या मंदिरातून रुख्मिणीचे हरण केले ते कुलदेवी अंबामाता मंदिर अमरावतीत आहे. कृष्णाकडून पराभूत झालेला रुख्मि पूढे जिथे राहिला ते गाव भातुकली (भोजपूर) आणि कृष्णाने जिथे भरधाव रथाची धूर टेकली.. तहानलेल्या रुख्मिणीला बाणाने विहीर खोदून पाणी दिले ते गाव म्हणजे मालधूर ही पण गावे इथेच आहेत.
कृष्णाचे वऱ्हाड इथे आले म्हणून हा भाग वऱ्हाड. या पुराणकथांनी व्दारकेशी.. पंढरपूरशी लोकांचे नाते दृढ होत विठ्ठल रुख्मिणीमातेवरच्या सश्रद्ध भक्तीचा आनंद लुटतात. प्रत्यक्ष परमेश्वर आमचा जावई असल्याचा अभिमान येथील जनतेला आहे.

Ashta Lakshmi stotram                                            Sant Naam Gatha 1                                             Sant Naam Gatha 2                                            Sant Naam Gatha 3                                                       

Open chat
1
We're Online! How may I help you?
We're Online!
How may I help you?