Englishमराठी
सर्व भाविकांसाठी ऑनलाइन नोंदणीकृत पूजा बुकिंग लवकरच चालू करतो आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी. सर्व भाविकांना ही नम्र विनंती आहे की मंदिराची 175 वा वाढदिवस लवकरच साजरा करण्यात येणार आहे. तसेच मंदिराचा शिखराचे काम सध्या चालूआहे. . आमचा प्रयत्न हा आहे, की , जुन्या पद्धतीने 175 वर्षापूर्वी स्थापना केलेले मंदिर जसे होते, काळा पाषाणमधील दगडी चिरे त्याच पद्धतीने आपल्या समोर सादर व्हावेत म्हणूनच रंग काढण्याचे काम सध्या चालू आहे. हे काम क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे. त्याला तुमच्या सर्वांची मदत अपेक्षित आहे. आपल्या भावनांचा आदर करून आम्ही आपल्या मदतीची अपेक्षा करतो आहे.

Kanaka

? आनंदी पहाट ?

विठ्ठलाला प्रेमळ साद घालणारी

⚜️⚜️⚜️⚜️⚜️
!! मनाचिये वारी पंढरीची !!
⚜️⚜️⚜️⚜️⚜️

?⚜️?????⚜️?

कनकासवें जैसी कांती
सूर्यासवे जैसी दीप्ती
तैसी अवतरली कृष्णशक्ती
विदर्भदेशी रुख्मिणी
….. संत एकनाथ

कौडिंण्यपूर (कुंडनपूर) जि. अमरावती (प्राचीन इंद्रपुरी) हे विदर्भातील गाव म्हणजे प्रति पंढरपूर. कृष्णाशी रक्ताचे नाते जुळलेला हा पवित्र भूभाग. ‘मनाचिये वारी’ त दहा पालखीपैकी ४२५ वर्षे परंपरेची कौडिंण्यपूरची ही एक आई रुख्मिणीची पालखी. या पालखीचे ४० ठिकाणी मुक्काम होतात, एवढा प्रदीर्घ प्रवास.
पौराणिक काळ लगेचच डोळ्यासमोर तरळावा अशी ही सगळी गावे. कौडिंण्यपूर ही विदर्भ देशाचा राजा भीष्मकाची राजधानी होती. राजा भीष्मकाने कन्यारत्न झाल्याचा मोठा उत्सव राज्यात साजरा केला. दानधर्म केला. कन्येचे नाव ठेवले रुख्मिणी. जी सोन्यासारखी तेजःपुंज आहे. जी कृष्णाची शक्ती आहे. जी भक्तांसाठी जगन्माता आहे.
रुख्मिणीमाता आदर्श कन्याही.. तिच्या भावाने (रुख्मिने) राजकारणासाठी ठरवलेला विवाह टाळून तिने कृष्णाला प्रेमाची गळ घातली आणि गळ्यात माळही घातली हे सर्वश्रूतच.
कृष्णाने रुख्मि.. शिशुपाल.. जरासंध यांना युद्धात हरवून ज्या मंदिरातून रुख्मिणीचे हरण केले ते कुलदेवी अंबामाता मंदिर अमरावतीत आहे. कृष्णाकडून पराभूत झालेला रुख्मि पूढे जिथे राहिला ते गाव भातुकली (भोजपूर) आणि कृष्णाने जिथे भरधाव रथाची धूर टेकली.. तहानलेल्या रुख्मिणीला बाणाने विहीर खोदून पाणी दिले ते गाव म्हणजे मालधूर ही पण गावे इथेच आहेत.
कृष्णाचे वऱ्हाड इथे आले म्हणून हा भाग वऱ्हाड. या पुराणकथांनी व्दारकेशी.. पंढरपूरशी लोकांचे नाते दृढ होत विठ्ठल रुख्मिणीमातेवरच्या सश्रद्ध भक्तीचा आनंद लुटतात. प्रत्यक्ष परमेश्वर आमचा जावई असल्याचा अभिमान येथील जनतेला आहे.
?♾️?♾️?♾️?♾️?
जगात निरपेक्ष.. निस्वार्थ.. निर्व्याज्य प्रेम करते ती फक्त आईच. विठ्ठलही भक्तांवर तसेच प्रेम करतो.. काळजी वाहतो म्हणून संत विठ्ठलाला माऊली म्हणतात.
विठ्ठल घरी यावा वाटत असेल तर तेवढी व्याकुळता हवी. जी संत जनाबाईंकडे होती. त्या म्हणतात की तुझ्या चरणाशी लाखोंचे जीवन समृद्ध करणाऱ्या भीमा.. अमरजा जीवनदायीनी आहेत. तू माझ्या अंगणी ये म्हणजे माझेही जीवन शुद्ध.. सात्त्विक.. आनंदमय होईल. तुझ्या कृपेच्या गुणांनी हे जीवन उजळून निघेल.
विठ्ठल भेटीची ओढ संत जनाबाई गोड शब्दांत व्यक्त करत आहेत.

?⚜?????⚜?

येग येग विठाबाई,
माझे पंढरीचे आई ॥धृ॥

भीमा आणि चंद्रभागा,
तुझे चरणीची गंगा ॥१॥

इतुक्यासहित त्वा बा यावे,
माझ्या रंगणी नाचावे ॥२॥

माझा रंग तुझे गुणी,
म्हणे नामयाची जनी ॥३॥

?????????

रचना : संत जनाबाई ✍️
संगीत : वसंत प्रभू
स्वर : आशा भोसले

????? ?

‼पुंडलीक वरदा हरि विठ्ठल‼

!! नियम पाळा, सुरक्षित रहा !!

??सुमंगल प्रभात??
१४.०७.२०२१

?????????

Open chat
1
We're Online! How may I help you?
We're Online!
How may I help you?